माभळे पुनर्वसन येथील यद्रे कुटुंबियांची खोली मोडकळी

ससंगमेश्‍वर बाजारपेठ येथील महापुरामुळे येथील ग्रामस्थांचे माभळे पुनर्वसन येथे पुनर्वसन करण्यात आले. मात्र घरातील परिस्थितीपुढे एका कुटुंबाला हात टेकावे लागले आहेत. वाढते वय आणि घरात कुणीही कमावते नसल्याने त्यांना आपले एक एक दिवस मोजून जगावे लागत आहेत. या वयोवृद्ध कुटुंबाला आज मदतीची गरज आहे.दत्ताराम (आबा) सोमा यद्रे (७५), पत्नी जयश्री दत्ताराम यद्रे (७०) यांना मुल-बाळ नसल्याने म्हातारपणात ते निराधार झाले आहेत. ते संगमेश्‍वर माभळे पुनर्वसन येथे राहतात. १९८३ मध्ये संगमेश्‍वरात महापूर आला होता. या पुरानंतर अनेकांचे पुनर्वसन माभळे येथे करण्यात आले. काहींना जागा दिल्या तर काहींना खोल्या देण्यात आल्या होत्या.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button