बेशिस्त वाहने उभी करणार्यांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
रस्त्यावर धोकादायक स्थितीत वाहने उभी करणार्या वाहनचालकांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ व १४ एप्रिल रोजी रत्नागिरी ग्रामीण व जयगड पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. परशुराम हनुमंत चौगुले व संजय रामा तावडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परशुराम चौगुले यांनी आपल्या ताब्यातील डंपर (एमएच-०८ एक्यू ९७७७) हा १३ एप्रिल २०२४ रोजी निवळी तिठा येथे धोकादायक स्थितीत उभा करून ठेवला होता. अशी नोंद रत्नागिरी ग्र्रामीण पोलिसांकडून करण्यात आली. तर संजय तावडे यांनी आपल्या मालकीची मोटार कार (एमएच-०८ एएन ००५२) ही रस्त्यावर धोकादायक स्थितीत उभी करून ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानुसार दोन्ही संशयितांवर भादंवि कलम २८३ गुन्हा दाखल करण्यात आला.www.konkantoday.com