निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी विविध विभागांचे शासकीय, निमशासकीय कर्मचारी करणार १० दिवस आधीच मतदान
जगातील सर्वात मोठी मानली जाणारी भारतातील निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी विविध विभागांचे शासकीय, निमशासकीय कर्मचारी मोठ्या प्रमाणात नियुक्त केले जातात. मतदारांप्रमाणेच या कर्मचारी वर्गालाही आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष व्यवस्था करावी लागते. मात्र या प्रक्रियेतील गुंतागुंत टाळण्यासाठी अनेक कर्मचारी मतदान करणेच टाळतात, असे निदर्शनास आले होते. यासाठी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या रत्नागिरीतील कर्मचारी वर्गातील टपाली मतदानाची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्यक्ष मतदान दिनाच्या ७ मेच्या आधी १० दिवस म्हणजे २७ एप्रिल रोजीच त्यांची टपाली मते एकत्र केली जाणार आहेत.www.konkantoday.com