
कोल्हापूरमधून चिपळूणला आठ टन काळा गुळ घेवून जाणारा ट्रक पकडला.
*गुहागर तालुक्यातील आबलोली चेक नाक्यावर कोल्हापूरमधून चिपळूणला आठ टन काळा गुळ घेवून जाणारा ट्रक पकडून, दोघांवर दारूबंदी कायद्याअंतर्गत गुहागर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोल्हापूरवरून थेट चिपळूणला जाण्याऐवजी संगमेश्वरमधून गुहागर तालुक्यात दाखल होणारा काळ्या गुळाचा ट्रक चिपळूणमध्ये विना परवाना चोर मार्गाने शिरण्याचा प्रयत्न करत होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यामध्ये पोलीस गस्त घालत होते. (दि.16 ) पहाटे तीन वाजता गुहागर तालुक्यातील आबलोली चेक नाक्यावर आठ टन काळा गुळ वाहतूक करणारा ट्रक गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत, कॉन्स्टेबल रवींद्र आठवले, अमोल गायकवाड यांच्या देखरेकीमध्ये पकडला गेला.www.konkantoday.com