कळवंडे धरण असूनही चार गावांना पाण्यासाठी करावी लागतेय वणवण
चिपळूण तालुक्यातील कळवंडे येथील सुरक्षित असलेले धरण केवळ अधिकार्यांच्या अधिक फायदद्यासाठी वापरल्याने धरण पूर्णपणे रिकामे झाले असून आज पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ कळवंडे, कोंढे, पाचाड, रेह-भागाडी या चार गावच्या ग्रामस्थांवर आली आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती कळवंडीवासीयांची झाली आहे. संतप्त ग्रामस्थांनी या प्रकरणी तीव्र भावना व्यक्त करून प्रशासनाचे वाभाडे काढले. प्रशासनाला काही पडलेली नाही, आम्ही आमची गुरेढोरे, झाडे मेली तरी चालतील अशी त्यांची भूमिका आहे. आम्ही मात्र आता हतबल आहोत. प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने आम्ही या लोकसभा निवडणुकीत एकाही उमेदवाराला या भागात फिरकू देणार नाही किंवा गावच्या प्रवेशद्वारावर फलक लावून कार्यकर्त्यांना प्रचारालाही मज्जाव करू, या चार गावातील आम्ही १० हजार मतदार मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचा एकमुखी निर्णय ग्रामस्थांनी घेतला. www.konkantoday.com