अवघ्या वर्षभरातच गुहागर बायपास रोडला खड्डे, ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी
चिपळूण शहरातील मुंबई-गोवा महामार्गावरील पाग येथे जाणार्या गटारावरील स्लॅब खचलेला असताना दुसरीकडे नव्याने वर्षभरापूर्वी तयार करण्यात आलेल्या गुहागर बायपास या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. माजी नगरसेवक, चिपळूण अर्बन बँकेचे ज्येष्ठ संचालक मोहनशेठ मिरगल यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.वर्षभरापूर्वीच गुहागर बायपास रोडची दुरूस्ती करण्यात आली. मोठा गाजावाजा करून डांबरीकरण करण्यात आले, परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे झाले, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. देसाई बाजार समोरील रस्त्यावर मोठे अनेक खड्डे पडले आहेत. वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे खड्डे पडले आहेत. या रस्त्याचे डांबरीकरण करणार्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी मोहनशेठ मिरगल यांनी केली आहे. www.konkantoday.com