अयोध्येत सूर्यतिलक सोहळा संपन्न – पंतप्रधान मोदींनी घेतले ऑनलाईन दर्शन
देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीनंतर रामललाची ही पहिलीच रामनवमी आहे. आज रामललाचा दिव्य राज्याभिषेक झाला आज आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला ते रामललाचा ‘सूर्यतिलक’.दुपारी १२ वाजता रामललाचे सूर्य तिलक करण्यात आले. खास तंत्रज्ञानाच्या मदतीने सूर्यकिरणे रामललाच्या कपाळाच्या मधोमध पडल्याचे दिसून आले. राम मंदिरात जेव्हा रामललाचा सूर्य टिळक सोहळा होत होता, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील नलबारी येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते. पण जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर लगेचच पीएम मोदींनी त्यांच्या टॅबमध्ये अयोध्येतील रामललाच त्या अद्भुत क्षणी पाहिले. खुद्द पीएम मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करून ही माहिती आणि फोटो शेअर केला आहे.