पावसाचा सर्वात मोठा फटका दुबईला बसला,दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात पाणी
युनायटेड अरब अमिराती हा वाळवंटी देश म्हणून ओळखला जातो. पण, सध्या या देशात पावसाने हाहाकार माजवला आहे असंच म्हणावं लागेल. अनेक भागात पुराची स्थिती निर्माण झाली आहे.पावसाचा सर्वात मोठा फटका दुबईला बसला आहे. दुबईला येणारी अनेक विमाने दुसरीकडे वळवण्यात आली आहेत.
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात पाणी शिरलं आहे. त्यामुळे अनेक फ्लाईट काही काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत. भारतातून दुबईला जाणाऱ्या फ्लाईटना देखील याचा फटका बसला असल्याचं कळतंय. शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शिवाय वाहतूक बंद झाली आहे
www.konkantoday.com