श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशनतर्फे २१ एप्रिल रोजी मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन

रत्नागिरी : रक्तदान हे केवळ सर्वोत्तम दान नाही तर रक्तदान म्हणजे जीवनदान करण्यासारखे आहे, कारण आपण केलेल्या रक्तदानामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो. त्यामुळे ज्याच्यासाठी हे शक्य आहे अशा प्रत्येक व्यक्तीने रक्तदान करावे, हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य आहे. हे श्रेष्ठ दान करण्याची संधी लवकरच आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे.1999 पासून, सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट, श्री अनिरुद्ध आदेश पथक, अनिरुद्ध समर्पण पथक, दिलासा मेडिकल अँड रिहाबईलेशन रिहॅबिलेटेशन सेंटर आणि श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन आणि संलग्न संस्थांतर्फे दरवर्षी एप्रिलमध्ये एक मेगा रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. आत्ता पर्यन्त झालेल्या मेगा ब्लड डोनेशन कॅम्प द्वारे जवळपास 1,88,000 यूनिट रक्त जमा केले आहे. ह्या वर्षी 21 एप्रिल 2024 रोजी मुंबई, रत्नागिरी जिल्हा त्याचबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खालील ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. या शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सहभाग कौतुकास्पद आहे. २१-०४-२०२४ रोजी खालील ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.

1. गुहागर

स्थळ : साई मंदिर, कुलस्वामिनी चौक, गुहागर, वेळ : स.१०.०० ते दु ४.००संपर्क : 1) श्री राजेंद्रसिंह आरेकर – 09764426395 2) श्री संजीवसिंह ढेपसे – 9969076244

२. चिपळूण स्थळ : दत्तमंदिर खेर्डी वेळ : १०.०० ते ४.००संपर्क

संजयसिंह आळवे – 9422054111 ३. खेडस्थळ : एल पी इंग्लिश स्कूल, खेड एस टी स्टँड जवळ, वेळ : स ९.३० ते दु २.३०संपर्क : अभिजितसिंह पाटणकर – 9028461711

४. लोटेमलस्थळ : परशुराम हॉस्पिटल, घाणेकुंट, लोटेमल, वेळ : स १०.०० ते दु १.००संपर्क : सुनीलसिंह उतेकर – 9850528275

५. दापोलीस्थळ : चैतन्य सभागृह, आदरणीय गोपाळकृष्ण सोहनी विद्यामंदिर, दापोली,वेळ- स १०.०० ते दु ४.०० संपर्क : मुकेश कालेकर – 9226173890

६. जैतापूरस्थळ : प्राथमिक आरोग्य विभाग, जैतापूर वेळ : स ९.०० ते दु १.००संपर्क: राकेशसिंह दांडेकर – 092724 37914

७. विलवडे लांजास्थळ : जिल्हा परिषद पूर्ण केंद्र प्राथमिक शाळा, विलवडे, वेळ : स.९.०० ते दु.२.००संपर्क:- विकाससिंह लाड – 086689 50811

८. देवरुखस्थळ : श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालय, मोदक उद्यान जवळ, देवरुख वेळ : स १०.०० ते दु १.००संपर्क:- गिरीशसिंह गानू – 9960558398 तसेच, रत्नागिरी तालुक्यात अतुलित बलधाम, नाचणे, टीआरपी येथे २८-०४-२०२४ रोजी स.१०.०० ते दु ४.०० या वेळेत रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे (संपर्क:- दीपकसिंह सावंत – 9421139489).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button