लग्नाच्या स्वागत समारंभासाठी आलेल्या महिलेवर कात्रीने केला वार
लग्नाच्या स्वागत समारंभासाठी आलेल्या महिलेवर दुसर्या एका महिलेने कात्रीने वार केल्याची घटना १४ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यात तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. याप्रकरणी त्या महिलेवर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला.जखमी महिला तिच्या मावशीच्या मुलाच्या लग्नाकरिता मुंबईहून चिपळूण येथे लग्नाला स्वागत समारंभासाठी गोवळकोट येथील मुमताज हॉल येथे कुटुंबासह आली होती. यावेळी काहीही कारण नसताना दुसर्या एका महिलेने तिच्या हातातील कात्रीने त्या महिलेच्या कंबरेच्या बाजूला वार करण्याचा प्रयत्न केला. ही कैची डोक्यात, मारल्याने यात त्यांना दुखापत झाली आहे.www.konkantoday.com