राजापूर पोलिसांना हक्काच्या घराची प्रतीक्षा
राजापूर तालुक्यात राजापूर व नाटे सागरी अशी दोन पोलीस स्थानके आहेत. यातील राजापूर पोलीस स्थानकातील अधिक़ारी व कर्मचार्यांसाठी शासकीय निवासस्थाने आहेत. मात्र सद्यस्थितीत या निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे जतनेचे संरक्षण करणार्या पोलिसांना अशा निवासस्थानांमध्ये जीव मुठीत धरून वास्तव्य करावे लागत आहे. गेली अनेक वर्षे पोलीस वसाहतीचा प्रश्न प्रलंबित राहिल्याने राजापूर पोलिसांसाठी असलेल्या तीनही वसाहती सद्यस्थितीत राहण्यास धोकादायक बनल्या आहेत. येथील अधिकारी, कर्मचार्यांना खासगी खरांचा आसरा घ्यावा लागत आहे.www.konkantoday.com