रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोठे शक्ती प्रदर्शन करीत ठाकरे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून युतीचा उमेदवार अद्याप ठरला नसतानाच महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार शिवसेनेमार्फत आपला उमेदवारी अर्ज आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करणार आहेत.
महाविकास आघाडीमार्फत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दि.12 एप्रिलपासून 19 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. खा.राऊत यांनी आज मंगळवारचा उमेदवार साधला असून उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी खा.राऊत मराठा भवन येथे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.
मराठा भवन येथे सकाळी 11.30 वाजता होणाऱ्या सभेला शिवसेनानेते आ.भास्करशेठ जाधव, माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक, सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, सचिन कदम यांच्यासह सर्व तालुकाप्रमुख, महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मोठे शक्ती प्रदर्शन करत राऊत हे उमेदवारी अर्ज दाखल करतील
www.konkantoday.com