रत्नागिरी नगर परिषदेने एक दिवस आड पाणी सोडण्याचा निर्णय पुढे ढकलला
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणामध्ये १.१७६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. धरणात उपलब्ध असणारा पाणीसाठा दि.१५ जूनपर्यंत पुरेल, असा विश्वास रत्नागिरी नगर परिषदेने व्यक्त केला आहे.त्यामुळे रत्नागिरीकरांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे एक दिवस पाण्याचे संकट तूर्तास तरी निवारले आहे.रत्नागिरी शहरात ११ हजार २८८ नळजोडण्या आहेत. त्यांना दिवसाला २० दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जातो. गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने यावर्षी तीन महिने आधीपासून पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात करून शहराला पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. त्यानुसार दर सोमवारी व गुरुवारी पाणी कपात केली जात आहे. www.konkantoday.com