
माझं नाव अरविंद केजरीवाल आहे, मी दहशतवादी नाही” मुख्यमंत्र्यांचा तुरुंगातून भावनिक संदेश
आम आदमी पार्टीचे (आप) राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी तुरुंगातून लोकांना संदेश पाठवला आहे. “माझं नाव अरविंद केजरीवाल आहे, मी दहशतवादी नाही” असं त्यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत संजय सिंह यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. “तुम्ही अरविंद केजरीवाल यांना दहशतवाद्यांप्रमाणे वागवत आहात, तुम्हाला लाज वाटत नाही का? अरविंद केजरीवाल आणि त्यांचं कुटुंब, मुलांची भेट ही काचेच्या भिंतीतून केली जात आहे.””पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना झेड प्लस सुरक्षा आहे, ते केजरीवाल यांना भेटले तेव्हा त्यांच्यामध्ये काचेची भिंत होती. केजरीवाल यांच्याबद्दल द्वेष असल्याचं भाजपाने आपल्या या कारवाईतून स्पष्ट केलं आहे” असं संजय सिंह यांनी म्हटलं आहे www.konkantoday.com




