महायुतीमध्ये मिठाचा खडा कोण आहे, याचं आत्मपरिक्षण त्यांनीच करावं -माजी आमदार सूर्यकांत दळवी
महायुतीमध्ये मिठाचा खडा कोण आहे, याचं आत्मपरिक्षण त्यांनीच करावं, दापोली विधानसभा मतदार संघ कोणाची मक्तेदारी नाही, हे येत्या काळात आम्ही दखवून देवू. यापूर्वी खेडमध्ये भाजपचे करंट अकाऊंट होते, आता सेव्हिंग अकाउंट आहे, असा टोला दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार सुर्यकांत दळवी यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांचे नाव न घेता लगावला आहे.खेड शहरातील पाटीदार भवन या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुर्यकांत दळवी यांनी आपल्या भाषणामध्ये रामदास कदम यांच नाव न घेता टीका केली. महायुतीमध्ये मिठाचा खडा कोण आहे, याचं आत्मपरिक्षण त्यांनीच करावं. अनेक नेते झाले. मात्र खेडमध्ये सर्वाधिक भाग टंचाईग्रस्त म्हणून ओळखला जातो. सगळ्यात जास्त टँकर खेडमध्ये पाण्यासाठी धवतात. लोटे एमआयडीसीमध्ये प्रदूषणाची समस्या आजवर कोणीही सोडवलेली नाही, राजकीय व्यक्तींना त्यासाठी अपयश आलेले आहे. www.konkantoday.com