भरणेतील नव्या जगबुडी पुलावर विरूद्ध दिशेने वाहने हाकणार्यांवर पोलिसांची करडी नजर
खेड शहरातील वाहतूक कोंडीचा ऐरणीवर आलेला प्रश्न निकाली काढून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी कुठेही अन कशा पद्धतीने वाहने उभी करणार्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या पाठोपाठच भरणेतील नव्या जगबुडी पुलावरही विरूद्ध दिशेने वाहने हाकणार्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. या पुलावरून विरूद्ध दिशेने हाकण्यात येणार्या वाहनांमुळे अन्य वाहनचालकांची फसगतच होत आहे. याशिवाय प्रसंगी अपघातही घडत आहेत. या ठिकाणीही नियमांचे उल्लंघटन केल्यास वाहनचालकांवर थेट आता गुन्हेच दाखल होणार आहेत. www.konkantoday.com