
राजापूर मतदार संघात काँग्रेसचे अविनाश लाड यांची बंडखोरी कायम ,महा विकास आघाडीचे उमेदवार अडचणीत
. राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. आज (४ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. लाड यांनी अपक्ष भरलेला अर्ज मागे न घेतल्यामुळे व या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे.राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, अशी आग्रही मागणी अविनाश लाड यांनी केली होती; हा मतदारसंघ ठाकरे शिवसेनेला सोडून विद्यमान आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे अविनाश लाड यांनी बंद करायचा पक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता