
पावस येथे पायावरून ट्रक गेल्याने तरूण जखमी, ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी तालुक्यातील पावस येथे आंबा बागेच्या आवारात झोपलेल्या कामगाराच्या पायावरून ट्रक गेल्याने तरूण जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. टेमदेव रामभाऊ हांडेकर (३३) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. विराज नंदकुमार शिंदे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ट्रकचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टेमदेव हा पावस येथे आंबा बागेत काम करण्यासाठी गेला होता. रात्री जेवण करून तो कामगाराच्या खोलीबाहेर तो झोपला. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास विराज शिंदे हा आंबे भरलेला ट्रक घेवून त्याठिकाणी आला. ट्रक मागे घेत असताना ट्रकची चाके टेमदेवच्या पायावरून गेली अशी नोंद पूर्णगड पोलिसांत करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी विराज याच्याविरूद्ध भादंवि कलम २७९, ३७, ३८ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.www.konkantoday.com