निवडणुक जाहीरनाम्यात ‘पाण्याचा प्रश्न’ आहे कूठे
लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. विविध राजकीय पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत. त्यात लुभावणाऱ्या अनेक आश्नासनांचा समावेश आहे; परंतु देशातील निम्म्या लोकसंख्येला ज्या गहन प्रश्नाशी संबंध आहे आणि ज्याला उन्हाळ्यात सोन्याचे महत्त्व येते, त्या पाणी प्रश्नाकडे कोणत्याही राजकीय प्रश्नाचे फारसे लक्ष नाही. ‘हर घर जल’ ही योजनाही किती फसवी आहे आणि त्याबाबतचे दावे कसे वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे आहेत, हे सध्याच्या पाणीटंचाईच्या स्थितीकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. जगातील एकूण लोकसंख्येपैकी 17 टक्के लोक भारतात राहतात; परंतु जगातील फक्त चार टक्के गोड्या पाण्याचे स्रोत येथे उपलब्ध आहेत. देशाच्या 140 कोटी लोकसंख्येपैकी 35 कोटी लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध नाही; मात्र हा गंभीर मुद्दा एकाही नेत्याने मांडला नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात या समस्येचा उल्लेखही केलेला नाही, याचे आश्चर्य वाटते.’नीती’ आयोगाच्या अहवालानुसार, देशातील हजारो लोकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहेwww.konkantoday.com