ठाकरे गटाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला
ठाकरे गटाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला राऊत यांनी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करीत मिरवणुकीने अर्ज दाखल केला यावेळी सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आधी मराठा भवन येथे ते सर्व कार्यकर्ते एकत्रित झाले त्यावेळी उमेदवार विनायक राऊत व अन्य शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर मिरवणुकीने हे सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यात आले या मिरवणुकीच्या वेळी कार्यकर्त्यांनी राऊत यांना खांद्यावर उचलून घेतले होते तर मिरवणुकीच्या ढोल पथकात स्वतः विनायक राऊत यांनी ढोल वाजवून आनंद लुटलात्यानंतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राऊत यांनी अर्ज दाखल केला त्यानंतर पत्रकारांशी बोलताना विनायक राऊत म्हणाले की मी उमेदवारी अर्ज भरला याचा मला आनंद झाला आहे माझा विजय निश्चित आहे. महायुतीचा जो कोणी उमेदवार रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून उभा राहील त्यांनी ठरवून यावं की त्याचा अडीच लाखांनी पराभव होणार आहे हे निश्चित असेही राऊत शेवटी म्हणाले.यावेळी आमदार भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी, युवा सेना अध्यक्ष वरूण सरदेसाई जिल्हा प्रमुख विलास चाळके, संदेश पारकर, राजेंद्र महाडिक, बंडया साळवी, आबा घोसाळे संजय साळवी, प्रशांत साळूंखे, सह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यामुळे हा सर्व परिसर भगवामय झाला होताwww.konkantoday.com