
उद्धवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या संपत्तीत १ कोटी ४९ हजार ४२० रुपयांनी वाढ
रायगड लोकसभा मतदारसंघासाठी इंडिया आघाडीचे उद्धवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्रात ८ कोटी १९ लाख ५९ हजार ७९८ रुपये ८९ पैसे एकूण संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे.२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या शपथ पत्रामध्ये सादर केलेल्या एकूण संपत्तीपेक्षा आता संपत्तीत १ कोटी ४९ हजार ४२० रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यांच्यावर २ कोटी १३ लाख ४१ हजार २६८ रुपये इतके कर्ज आहे. गिते यांच्यावर कोणताही गुन्हा नाही आहे, असे दिलेल्या शपथ पत्रात म्हटले आहे. गीते हे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत. सोमवारी गिते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. २०१९ मध्ये उमेदवारी अर्ज करताना गिते यांनी शपथपत्रात सात कोटी १९ लाख १० हजार ३७८ रुपये असल्याचे जाहीर केले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जाहीर केलेली एकूण संपत्ती चार कोटी ४४ लाख ६६ हजार ४८७ होती. www.konkantoday.com