फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी 25 एप्रिल पर्यन्त ई-पीक पाहणी पूर्ण करावी

रत्नागिरी, दि. 23 : सर्व फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी दि. 25 एप्रिल पर्यन्त ई-पीक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.* पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना दि. १२ जून, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत आंबिया बहार सन २०२४-२५ मध्ये आंबा व काजू या फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे .सन २०२४-२५ करिता जिल्ह्यातील ३६ हजार ४६८ फळपीकधारक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविलेल्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे.

ज्या शेतकऱ्यांनी फळपिकांचा विमा घेतलेला आहे, परंतु, फळपिकांची ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाइल अॕपद्वारे केलेली नाही त्यांनी दि. २५ एप्रिल २०२५ पर्यन्त ई-पीक पाहणी पूर्ण करावी. अन्यथा दि. १२ जून, २०२४ रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार ७/१२ उताऱ्यावर ई-पीक पाहणीची नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येतील व फळपीक विम्याचा लाभ दिला जाणार नाही, याची फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button