
लांजा तालुक्यातील पुनसमध्ये आढळले बिबट्याचे पिल्लू.
लांजा पुनस-रत्नागिरी मार्गावर पुनस येथे अवघ्या १५ ते २० दिवसांचे बिबट्याचे पिल्लू रविवारी रात्री सापडले. सध्या हे पिल्लू लांजा येथे वनविभाग अधिकार्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. पुनस फोफळवणे येथे रात्री साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान हे पिल्लू रस्त्यावर आढळून आले होते. याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर लांजा वनपाल सारिक फकीर घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर या पिल्लाला ताब्यात घेण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीठी सातारा येथून तज्ञ वैद्यकीय अधिकार्यांना पाचारण करण्यात आले आहे.www.konkantoday.com