रत्नागिरी-सिंधुदुर्ग लाेकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराबाबत दिल्लीत पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेणार
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लाेकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराबाबत सर्वांनाच उत्कंठा लागली आहे. याबाबत दिल्लीत पार्लमेंटरी बाेर्डाची बैठक सुरू असून, त्या बैठकीत याेग्य ताे निर्णय हाेईल.या मतदारसंघात मंत्री उदय सामंत, किरण सामंत हे महायुती म्हणून काम करतील, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरीत सांगितले.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लाेकसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यालयाचे रत्नागिरीत रविवारी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, या उद्घाटन साेहळ्याला महायुतीचे आणि घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित हाेते. मतदारसंघात प्रचाराच्या दृष्टीने जे करावे लागेल ते सर्व याेजनाबद्ध करण्याबाबत या कार्यालयातून काम हाेईल, असे त्यांनी सांगितले.महायुतीमध्ये काही ठिकाणी शिवसेनेचे धनुष्यबाण आहे तर काही ठिकाणी घड्याळ आहे, काही ठिकाणी कमळ अशी निशाणी आहे. त्यामुळे महायुतीच्या वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या उमेदवारांना चिन्ह अपेक्षित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही वरिष्ठ मंडळी महायुतीला याेग्य ताे निर्णय घेतील, आम्हाला आवश्यक असणारे निर्णय ते नक्की घेतील. हा निर्णय लवकरच हाेणे अपेक्षित आहेwww.konkantoday.com