मॉरिशसमधील मराठी भाषिक बांधवांच्या लोककलेची आज रत्नागिरीकरांना पर्वणी कोकण मराठी साहित्य परिषद आणि श्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून संयुक्त आयोजनरत्नागिरीकरांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे कोमसापच्या अध्यक्षा नमिता कीर यांचं आवाहन
* रत्नागिरी :मॉरिशसमधील मराठी भाषिक बांधवांच्या दर्जेदार लोककलेची पर्वणी रत्नागिरीकरांना आज अनुभवता येणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषद आणि श्री प्रतिष्ठान रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मॉरिशस सरकारमान्य, मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट संस्थेच्या विशेष लोककलांचा कार्यक्रमाचे आयोजन आज १५ एप्रिल रोजी राधाबाई शेट्ये सभागृह येथे करण्यात आले आहे. शेकडो वर्षांपूर्वी इंग्रजांनी आपल्या सोबत कामासाठी अनेक भारतीय वंशाच्या लोकांना नेले. मॉरिशस देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता त्या पिढीचे पुढील वंशज विविध क्षेत्रात कार्यरत झाले आहेत. मॉरिशस मध्ये कार्यरत असतानाही त्यांनी आपल्या पूर्वजांच्या मातृभाषा, संस्कृतीचा विसर न पडू देता अत्यंत सचोटीने मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी संस्कृती सातासमुद्रापार असलेल्या मॉरिशस मधील मराठी भाषिक बांधवांनी अत्यंत प्रामाणिकपणे जपली आहे. हा धागा पकडून या सर्व मॉरिशसवासीय मराठी भाषिक बांधवांच्या कलेची ओळख सर्व रत्नागिरीकराना व्हावी, यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर यांच्या पुढाकाराने आणि श्री प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने सोमवार, दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५ ते ७ वा. राधाबाई शेट्ये सभागृह, गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथे मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी संस्कृती यांच्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर म्हणाल्या की, गेली अनेक वर्ष माॅरीशस मधील स्थाईक मराठी बांधवांनी मराठी भाषा-साहित्य आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा व तो वर्धिष्णू करण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याची ओळख आपल्यासमोर या कार्यक्रमाच्या माध्यमातून येत आहे. आपण रत्नागिरीकरानी या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद, श्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य प्रयत्न करत आहेत.www.konkantoday.com