महायुतीच्या प्रचारासाठी लवकरच मैदानात उतरणार – राज ठाकरे

रत्नागिरी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे मनसेप्रमुख राज ठाकरे, महायुतीच्या प्रचारासाठी लवकरच मैदानात उतरणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आघाडीसाठी प्रचार करताना ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून युतीची पोलखोल केली होती. यावेळी फासे उलटे पडले असून, मविआविरोधात राज ठाकरे प्रचार करताना दिसणार आहेत. त्यासाठी ते राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सभा घेणार असून, स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेतच्या बैठकीनंतरच सभेबबातचा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button