बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर हल्ला प्रकरणी हल्लेखोरांनी वापरलेली बाईक रायगडची
बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर रविवारी पहाटे हल्ला झाला होता. या हल्ल्या प्रकरणी अनेक पुरावे मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहेत.सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. हल्ला कुणी केला हे देखील तपासात निष्पन्न झाले आहे. या सोबतच त्यांनी वापरलेल्या दुचाकीबद्दल देखील माहिती मिळाली आहे. ही दुचाकी सेकंड हँड विकत घेण्यात आली असून ती रायगड येथून घेण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे.सलमान खान याच्यावर हल्ला झाल्यावर मुंबई पोलिसांनी या घटनेचा तपास अधिक वेगवान केला आहे. हल्लेखोर कोठून आले. कसे आले ? त्यांनी बाईक कोणती वापरली या बाबत मोठी माहिती तपासात पुढे आली आहे. सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याआधी हल्लेखोरांनी बाईक खरेदी केली होती. ही बाईक त्यांनी रायगड जिल्ह्यातून खरेदी केली असल्याचे तपसात पुढे आले आहे. ही जुनी बाईक असून या बाईकवरुन हल्लेखोर आले होते. ही बाईक सेकंड हँड खरेदी करून त्यांनी मुंबई गाठली. यानंतर सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार करून ते पसार झाले आहे. ज्यांच्या कडून ही बाईक खरेदी करण्यात आली पोलिस त्यांची देखील चौकशी करत आहेत.सलमान खान याला या पूर्वी देखील मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्याला जीवे मारण्याचे निनावी पत्र देखील मिळाले आहे. तर धमकीचे मेल देखील आले आहे. रविवारी झालेल्या हल्याची जबाबदारी लॉरेन बिश्नोई गँगने घेतली असून तशी फेसबूक पोस्ट देखील केली आहे. लॉरेन्स बिश्नोई हा बिश्नोई समाजाचा आहे. हा समाज निसर्ग पूजक आहे. सलमान खान हा काळविट मारण्याच्या प्रकरणातुन सुटला. दरम्यान हा समाज काळविटाला देव मानतो. यामुळे दरम्यान सलमान खानने दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप असून त्यामुळेच लॉरेन्सने सलमान खानला मारण्याची अनेक वेळा धमकी दिली आहे.www.konkantoday.com