निवृत्ती मानधनासाठी दोन सेविकेंचा सात वर्षे संघर्ष, कार्यवाही शून्यच
निवृत्तीवेतन अथवा मानधन हा कर्मचाऱ्यांचा हक्क आणि अधिकार असल्याचे म्हटले जाते. पण असे असताना दोन अंगणवाडी सेविका मात्र ते मिळविण्यासाठी सात वर्षे वाट पाहत आहेत. हा धक्कादायक प्रकार साखरपा कोंडगाव येथील दोन अंगणवाडी सेविकांबाबत घडला आहे. रेश्मा शंकर अभ्यंकर या अंगणवाडी सेविका सन २०१६ च्या फेब्रुवारी महिन्यात निवृत्त झाल्या. आधी युनिसेफ अंतर्गत आणि नंतर एकात्मिक बालविकास अंतर्गत तब्बल ३५ वर्षे अंगणवाडी सेविका म्हणून त्यांनी काम केले. वयाची ६५ वर्षे पूर्ण झाल्यावर २०१६ साली कोंडगाव बाजारपेठ येथील अंगणवाडीतून सेवानिवृत्त झाल्या. निवृत्त झाल्यावर त्यांना एक लाख एवढी सेवानिवृत्ती मानधन मिळते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अभ्यंकर यांनी त्याचवेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली होती. पण आजतागायत त्यांना हे मानधन मिळालेले नाही. www.konkantoday.com