ना.नारायणराव राणे यांनी उमेदवारी अर्ज घेतले असतील तर आम्हीही उमेदवार अर्ज घेणार -उद्योगमंत्री ना.उदय सामंत

रत्नागिरी-लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचाच आहे. त्यामुळे आम्ही या मतदार संघावर दावा केला आहे. आमचा दावा अद्याप कायम आहे. तीन्ही पक्षाच्या नेत्यांशी मी चर्चा केली आहे. तीनही नेते एकत्र चर्चा करुन येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय घेतील. भाजपातर्फे मंत्री ना.नारायणराव राणे यांनी उमेदवारी अर्ज घेतले असतील तर आम्हीही उमेदवार अर्ज घेणार असल्याचे शिवसेना नेते तथा उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांनी सांगितले. रत्नागिरीत ते पत्रकारांशी बोलत होते.रत्नागिरी-लोकसभा मतदार संघतील महायुतीच्या उमेदवारीबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. केंद्रीय मंत्री ना.नारायणराव राणेच उमेदवार असतील असा दावा भाजपातर्फे केला जात आहे. तर रत्नागिरी-लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा पारंपारिक मतदार संघ असल्याने तो आम्हालाच मिळावा असा दावा शिवसेना नेते ना.उदय सामंत यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर ना.उदय सामंत म्हणाले, रत्नागिरी-लोकसभा मतदार संघाबाबात कोणताच तिढा नाही. महायुतीचे नेते निर्णय घेताना एकत्रित चर्चा करुन निर्णय घेत असतात. मी तीनही नेत्यांसमवेत चर्चा केली आहे. तीनही पक्षाचे नेते पुन्हा चर्चा करुन रत्नागिरी-लोकसभा मतदार संघाच्या जागेबाबात निर्णय घेतील.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button