चिपळूण शहर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने आपल्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दाखल
चिपळूण शहर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने आपल्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी रात्री उशीरा पोलिसांनी महिलेसह दोघांना येथील पोलिसांनी रविवारी रात्री ताब्यात घेतले आहे.हा प्रकार मार्च ते एप्रिल दरम्यान घडला असून हा प्रकार उघडकीस येताच शहर परिसरात खळबळ उडाली आहे.पीडित अल्पवयीन मुलगी आरोपी महिलेची नातेवाईक आहे. तिचे आई-वडिल घरी नसताना ती त्या मुलीला लॉजवर घेऊन जात असे. काही वेळा मद्यपान करून ती मुलीला हा व्यवसाय करण्यास भाग पाडत असे. चिपळूणसह रत्नागिरी, खेड, लोणावळा आदी ठिकाणच्या लॉजवर पीडितेला नेऊन आत्याचार करण्यात आले होते. सातत्याने होत असलेल्या अत्याचाराने ही पीडित मुलगी कंटाळली होती. अखेर नरकयातनातून आपली सुटका करण्यासाठी तिने चिपळूण पोलीस स्थानक गाठले. तिने आरोपीविरुद्ध तक्रार दिल्यानुसार पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे. www.konkantoday.com