पक्ष फोडण्याचे काम आम्ही करीत नाही – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
पक्ष फोडण्याचे काम आम्ही करीत नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे दोन तुकडे झाले आहेत. यासाठी आम्हाला जबाबदार धरले जाते. पण, उद्धव ठाकरे यांचे पुत्रप्रेम तर शरद पवार यांच्या कन्याप्रेमामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तुकडे झाले आहेत,” असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे रविवारी झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. Www.Konkantoday.com