
2019 च्या निवडणुकीत या जागेवर शिवसेनेचा उमेदवार विजय झाल्याने ही जागा आम्हालाच मिळावी-उद्योग मंत्री उदय सामंत
सिधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा नारायण राणे यांच्यासाठी मागितली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.तर शिवसेनेने मात्र ही जागा पूर्वीपासून आमची असून 2019 च्या निवडणुकीत या जागेवर शिवसेनेचा उमेदवार विजय झाल्याने ही जागा आम्हालाच मिळावी, असं वक्तव्य राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हिंगोलीमध्ये केलं आहे.उदय सामंत म्हणाले आहेत की, ”सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे आणि भाजपने देखील दावा केला आहे. मागच्यावेळी शिवसेनेनं ती जागा लढली होती. धनुष्यबाणावर ती जागा लढून आम्ही जवळपास 1 लाख 75 हजारांनी जिंकलो होतो. ते खासदार जरी आमच्यासोबत आले नसले तरी धनुष्यबाण आमच्यासोबत आलं आहे. म्हणून शिवसेनेची ती सीट असावी, असा आमचा दावा आहे. आमचे नेते याबाबत निर्णय घेतील. येथून महायुतीचा उमेदवार पावणेदोन लाख मतांनी निवडून येईल.www.konkantoday.com