लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला. दिल्लीत भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपने संकल्प पत्र जाहीर केलं.या संकल्प पत्रात भाजपने अनेक आश्वासने दिली आहेत. यात एक देश, एक निवडणूक याचाही उल्लेख आहे. देशात पुन्हा भाजपची सत्ता आल्यास देशात न्याय संहिता लागू करण्यात येईल. तसंच रेल्वेसंदर्भातही अनेक आश्वासने दिली आहेत. रेल्वेची वेटिंग लिस्टची समस्या दूर केली जाईल. नॉर्थ इस्टमध्ये बुलेट ट्रेनवर काम करण्यात येईल असंही म्हटलं आहे.भाजपच्या जाहीरनाम्यात ओएनओपी, लखपती दीदी, पीएम सूर्य घर योजना, रामायण यात्रा, इन्फ्रा वर जास्तीत जास्त भर देण्यात आला आहे. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण, पेपर लीक कायदा लागू करणार, नवी शिक्षण धोरण, 2036 मध्ये ऑलिम्पिक यजमानपद, 3 कोटी लखपती दीदी बनवण्याची गॅरंटी संकल्प पत्रात देण्यात आलीय.1 गरीब कुटुंबांची सेवा, 2 मध्यम वर्गातील कुटुंबाचा विश्वास, 3 नारी शक्तिचे सशक्तिककरण, 4 तरुणांना संधी, 5 वरिष्ठ नागरिकांना प्राधान्य, 6 शेतकऱ्यांचा सन्मान, 7 मत्स्यपालन कुटुंबांची समृद्धी, 8 मजूरांचा सन्मान, 9 एमएसएमई, लहान व्यापारी आणि बांधकाम मजूरांचे सशक्तिकरण, 10 सबका साथ, सबका विकास 11 विश्वबंधु भारत, 12 सुरक्षित भारत, 13 समृद्ध भारत, 14 ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब करणार भारत, 15 जागतिक दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर, 16 ईज ऑफ लिविंग, 17 वारसा आणि विकास, 18 सुव्यवस्था, 19 निरोगी भारत, 20 गुणवत्तापूर्ण शिक्षण, 21 खेळाचा विकास, 22 सर्व क्षेत्रात समग्र विकास, 23 तंत्रज्ञान आणि नवकल्पना, 24 पर्यावरण अनुकूल भारत याबाबत मोदींची गॅरंटी या संकल्पपत्रात देण्ययात आल्या आहेत.www.konkantoday.com