भाजपचे युवा आमदार आणि हिंदुत्वाची भूमिका प्रखरपणे मांडणारे नीतेश राणे यांना भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले
भाजपचे युवा आमदार आणि हिंदुत्वाची भूमिका प्रखरपणे मांडणारे नीतेश राणे यांना भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले आहे. विशेष म्हणजे या यादीत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार, विधान परिषदेतील नेते प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर यांच्या नावांचा समावेश आहे.मात्र, राणे यांचे नाव वगळल्याने भाजपचे नेते, पदाधिकारी आणि विशेषतः संघ परिवारात आश्चर्य व्यक्त होत आहे.नीतेश राणे यांनी गेल्या दोन वर्षांत हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात सकल हिंदू समाजाच्या बॅनरखाली आवाज उठविला. नगर जिल्ह्यातील ख्रिश्चन धर्मांतरण, काही विशिष्ट ठिकाणी मुस्लिम धर्मियांकडून निर्माण केली जाणारी धार्मिक तेढ अशा असंख्य प्रकरणांत नीतेश राणे यांनी पुढाकार घेत ही प्रकरणे वेळोवेळी थेट विधीमंडळातील पटलावर आणली.त्यानंतर चौकशी होऊन अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन झालेले आहे, ही वस्तुस्थिती आहे. मुंबईतील अनधिकृत बांग्लादेशींच्या वास्तव्याकडे त्यांनी राज्याचे लक्ष वेधून घेतले.www.konkantoday.com