देशभरातील भाविक आणि यात्रेकरूंचे श्रद्धास्थान असलेली अमरनाथ यात्रा २९ जूनपासून सुरू
देशभरातील भाविक आणि यात्रेकरूंचे श्रद्धास्थान असलेली अमरनाथ यात्रा २९ जूनपासून सुरू होत आहे. लोकसभा निवडणूक संपन्न होताच प्रशासनाने संपूर्ण लक्ष अमरनाथ यात्रेवर केंद्रीत केले आहे.यासाठी ॲडवान्स बुकिंग नावनोंदणी उद्या सोमवार १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. याची नोंद घेण्याचे आव्हान श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाने केले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने सोशल मीडिया एक्सवरून दिले आहे. एएनआयने वृत्तात म्हटले आहे की, यावर्षी २०२४ ची अमरनाथ यात्रा २९ जून २०२४ पासून सुरू होईल आणि १९ ऑगस्ट २०२४ रोजी संपेल. यात्रेसाठी ॲडवान्स बुकींग उद्या दि. १५ एप्रिलपासून सुरू होत आहे. यावेळी जुलै महिन्यात बाबांच्या आरतीचे थेट प्रक्षेपण गुहेतून होणार आहे. नोंदणीसाठी अधिकृत असलेल्या बँकांच्या शाखांबद्दल तपशीलवार माहिती लवकरच दिली जाईल. नोंदणीसाठी आरोग्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यामुळे देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आरोग्य प्रमाणपत्रे तयार करणाऱ्या रुग्णालये आणि डॉक्टरांच्या पथकांची यादी जाहीर केली जाईल, असे देखील मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे.www.konkantoday.com