देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार किरण सामंत यांना भेटीसाठी नागपूरमध्ये बोलावले
शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचा तिढा आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपचे पहिल्या क्रमांकाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात सुटण्याची शक्यता आहे.उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शनिवारी झालेल्या भेटीनंतर त्यादृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गातून लढण्यासाठी इच्छूक असलेले शिंदे गटाचे उमेदवार किरण सामंत यांना भेटीसाठी नागपूरमध्ये बोलावून घेतले आहे. किरण सामंत यांनी फडणवीसांची भेट घेण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी किरण सामंत यांनी आपल्याला रत्नागिरी-सिंधुदुर्गात विजयाची 100 टक्के खात्री असल्याचे सांगितले.किरण सामंत यांनी म्हटले की, काल उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी मला आज भेटायला बोलावले आहे. माझे पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मला मान्य असेल. मी रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेनेकडून धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढण्यासाठी 100 टक्के आग्रही आहेwww.konkantoday.com