आमच्या पक्षाला नकली म्हणायला ती काय तुमच्या पदवी सारखी नकली आहे काय -उद्धव ठाकरे
आमचा पक्ष काय तुमच्या पदवी सारखा बनावट किंवा नकली आहे काय असा सवाल करीत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींनी त्यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला.काल बोईसर येथे घेतलेल्या सभेत बोलताना ठाकरे म्हणले की, आमच्या पक्षाची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी लोकांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी केली होती.भूमीपुत्रांच्या हक्कासाठी लढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिवसेनेला नकली म्हटले जात आहे. ते म्हणतात ही खोटी शिवसेना आहे. आमच्या पक्षाला नकली म्हणायला ती काय तुमच्या पदवी सारखी नकली आहे काय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. महाराष्ट्राच्या चंद्रपूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला नकली असे संबोधले हेाते. त्यांच्या पाठोपाठ अमित शहा यांनीही अशीच टीका करताना ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांचा उल्लेख बनावट पक्ष असा केला होता.शुक्रवारी मुंबईजवळील बोईसर येथे प्रचार सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी या टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी तीनशेहून अधिक जागा जिंकेल. ते म्हणाले,की मी हे अभिमानाने आणि आत्मविश्वासाने सांगत आहे की, भारत आघाडी सरकार स्थापन करेल आणि 300 पेक्षा जास्त जागा जिंकेल.www.konkantoday.com