
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर बसस्थानकाच्या कामाला सुरवात
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गजबजलेल्या संगमेश्वर बसस्थानकाच्या इमारतीसाठी ३ कोटी ५ लाख रुपये मंजूर झाले असून, या कामाला सुरवात झाली आहेबसस्थानक वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही इमारत दोनमजली उभारली जाणार असून, तळमजल्यावर उपहारगृह, आरक्षण आणि पासकक्ष, पोलिस चौकी, हिरकणी कक्ष तसेच बैठक व्यवस्थेबरोबरच पुरुष आणि महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे.नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पुरुष आणि महिलांसाठी विश्रांतीकक्षही उभारण्यात येणार आहे. गेली अनेक वर्षे संगमेश्वर बसस्थानक नूतन इमारतीच्या प्रतिक्षेत होते. स्वच्छतागृहांसह इमारतीची दुरवस्था झाली होती. ही इमारत येत्या ऑगस्ट महिन्यात प्रवाशांसाठी सज्ज होईल, असे प्रशासनाकडून सांगितले जात होते. संगमेश्वर बसस्थानकाची जुनी इमारत पूर्णपणे पाडण्यात आली असून, नवीन कामाला सुरवात झाली आहे.www.konkantoday.com