![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2024/04/images-20.jpeg)
अंबादास दानवे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड
शिवसेना उद्धव ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना आता आणखी एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.अंबादास दानवे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं सामनामधून आज ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. आधी जिल्हाप्रमुख, आमदार त्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि आता ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांची शिवसेना ठाकरे गटाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. www.konkantoday.com