विनापरवाना बंदुका बाळगल्याप्रकरणी लांजा-कोचरीतील एकास अटक

विनापरवाना दोन ठासणीच्या बंदुका जवळ बाळगल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी कोचरी येथील एकावर कारवाई केली. दोन्ही बंदुका जप्त केल्या आहेत. कोचरी गुरववाडी येथे बुधवारी ही कारवाई करण्यात आली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील कोचरी गुरववाडी येथील नंदकुमार दाजी गुरव (६७) यांच्याकडे दोन ठासणीच्या बंदुका असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. यानुसार लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब धुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलिासांनी बुधवारी १० एप्रिल रोजी सायंकाळी ७.४५ वाजता कोचरी गुरववाडी येथे जावून नंदकुमार गुरव यांची झडती घेतली. त्यांच्याकडे बंदूक वापरण्याचा अगर बाळगण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसतानाही २ ठासणीच्या बंदुका आढळल्या.या दोन्ही बंदुकांची किंमत प्रत्येकी ४ हजार याप्रमाणे एकूण ८ हजार रुपयांच्या दोन बंदुका पोलिसांनी जप्त केल्या आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button