
राजापूर-सौंदळमध्ये लागलेल्या वणव्यामध्ये शेतकर्याची हजारो झाडे खाक
राजापूर तालुक्यातील सौंदळ मांजरेकरवाडी येथे लागलेल्या वणव्यामध्ये येथील शेतकरी कानू तुकाराम मटकर यांची सुमारे १ हजार आंबा-काजू व अन्य झाडे जळून मोठे आर्थिक नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी मटकर यांनी कृषी विभागाकडे केली आहे.राजापूर तालुक्यात सर्वच भागात सध्या वणवा लागण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. वणवे लागतात की जाणीवपूर्वक लावले जातात, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असला तरी या वणव्यामध्ये शेतकर्यांनी कष्टाने जोपासलेल्या बागा काही क्षणात जळून खाक होत आहेत.www.konkantoday.com