रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात मतदारांशी संवाद साधण्याकरिता शनिवारपासून (ता.१३) नमो संवाद सभा
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात मतदारांशी संवाद साधण्याकरिता शनिवारपासून (ता.१३) नमो संवाद सभा प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आयोजित केल्या आहेत. यासाठी मतदार, बूथ अध्यक्ष, कार्यकर्ते आदींना निमंत्रित केले आहे. दररोज किमान पाच बैठकांचे नियोजन केले आहे. २७ एप्रिलपर्यंत होणाऱ्या या सभांमध्ये सुमारे २० हजार मतदारांशी संवाद साधला जाईल, अशी माहिती विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा लोकसभा सहप्रभारी बाळ माने यांनी दिली.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार या सभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. सभांना मतदारांसमवेत भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, जिल्हा, तालुका पदाधिकारी, बूथ अध्यक्ष उपस्थित राहतील. प्रत्येक सभेत २०० ते ३०० मतदारांना निमंत्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे व्हिजन काय आहे हे मतदारांना समजावून सांगण्यात येणार आहे तसेच पंतप्रधान मोदींचे काम, योजना, कर्तृत्व यावर भाषण होईल. सभा साधारण ४५ मिनिटे ते एक तासाच्या आहेत. यात ज्येष्ठ पदाधिकारी अॅड. बाबा परूळेकर, माजी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, अॅड. विलास पाटणे, माजी जिल्हाध्यक्ष अशोक मयेकर, महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, महिला आघाडी प्रदेश चिटणीस शिल्पा मराठे आदी पदाधिकारीसुद्धा या सभांना उपस्थित राहणार आहेत. हे सर्व पदाधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे विचार मतदारांपर्यंत पोहोचवतील.www.konkantoday.com