रत्नागिरी शहरातील जेलरोड येथील बीएसएनएल ऑफीस मधून अज्ञाताने तब्बल 1 लाख 6 हजार 650 रुपयांची चार केबल बंडल लांबवली

रत्नागिरी शहरातील जेलरोड येथील बीएसएनएल ऑफीसचे ग्राउंड फ्लोअरच्या पॅसेजमधून अज्ञाताने तब्बल 1 लाख 6 हजार 650 रुपयांची चार केबल बंडल लांबवली. ही घटना शनिवार 6 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 ते सोमवार 8 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वा.कालावधीत घडली आहे.याबाबत नंदकिशोर गुणाजी कदम (47,रा,रत्नागिरी) यांनी गुरुवार 11 एप्रिल रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, जेल रोड येथील बीएसएनएल ऑफीस ग्राउंड फ्लोअरच्या पॅसेजमध्ये 19 मार्च रोजी डीसी पॉवर केबलचे (कॉपर) 6 केबल बंडल ठेवण्यात आले होते. या बंडलपैकी 4 बंडल 6 एप्रिल ते 8 एप्रिलच्या कालावधीत अज्ञाताने चोरुन नेली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button