रत्नागिरीतील बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक; एकजण अटकेत
रत्नागिरीतील बांधकाम व्यावसायिकाची १० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली. निखिल शिवनाथसिंग ठाकूर असे या आरोपीचे नाव असून, त्याला उत्तर प्रदेशातील इटावा येथून अटक करण्यात आली. रत्नागिरीतील बांधकाम व्यावसायिक मुकेश गुंदेजा यांची १० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. गेल्या फेब्रुवारी महिन्यात हा गुन्हा घडला होता. बांधकाम व्यावसायिकाच्या वडिलांचे मित्र असल्याचे सांगून १० लाख रुपये मागण्यात आले. हे पैसे जेव्हा वडिलांच्या मित्राने घेतलेच नसल्याचे कळल्यानंतर ग्रामीण पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर तपासात तीन आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यातील निखिल ठाकूर याला अटक करण्यात आली असून इतर दोन आरोपींचा शोध घेतला जात आहे.www.konkantoday..com