भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त आंबडवेत उद्या विविध कार्यक्रम**रत्नागिरी, दि. 13 (जिमाका) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त प्रशासन व सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बाबासाहेबांच्या मूळ गाव आंबडवे तालुका मांडणगड येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अशी माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली
उद्या रविवार 14 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 9 पर्यंत शाहिरी व गीत गायनाचा कार्यक्रम, बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन, प्रतिमेची मिरवणूक, आरोग्य शिबीर तसेच ग्रंथ प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्मारकाच्या ठिकाणी येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांसाठी भोजन व्यवस्था सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.0000