
भाजप भटके-विमुक्त आघाडी पदाधिकारी आढावा बैठक रत्नागिरी येथे संपन्न.
रत्नागिरी दक्षिण-भाजप भटके विमुक्त आघाडी प्रमुख पदाधिकारी आढावा बैठक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष शांताराम उर्फ बाळा गोसावी , रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सिंधुदुर्ग जिल्हाअध्यक्ष भाजप भटके विमुक्त आघाडी तथा रत्नागिरी जिल्हा प्रभारी नवलराज काळे, रत्नागिरी दक्षिण जिल्हा अध्यक्ष भाजप भटके आघाडी निलेश आखाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. भटके विमुक्त आघाडी तालुका अध्यक्ष पदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या तालुका निहाय बैठका करून तालुका कार्यकारणी सक्षम करण्याच्या सूचना उपस्थित मान्यवरांनी पदाधिकारी यांना दिल्या. वाडी वस्ती वरती पोहोचून पक्षाने केलेले कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध राहो असा विश्वास नवनियुक्त पदाधिकारी यांनी उपस्थित मान्यवरांना दिला.*नव नियुक्त रत्नागिरी जिल्हा दक्षिण भाजप भटके विमुक्त आघाडी*जिल्हा प्रभारी श्री नवलराज विजयसिंह काळे.1) जिल्हाध्यक्ष श्री. निलेश आखाडे.2) जिल्हा उपाध्यक्ष – रतन माने3) जिल्हा उपाध्यक्ष- आनंत खरात.*भटके विमुक्त आघाडी रत्नागिरी दक्षिण मंडलाध्यक्ष खालील प्रमाणे*1) राजापूर पूर्व- सुनील पवार2) रत्नागिरी दक्षिण -सौ.कल्पना तांबे3) रत्नागिरी उत्तर- संतोष भगवान कोकरे4) रत्नागिरी शहर – देवा सकपाळ 5) लांजा- महेंद्र शेढे6) संगमेश्वर उत्तर- गणपत धोंडू कांबळे7) संगमेश्वर दक्षिण-सुरेश केदारी वरील जिल्हा पाधिकरी ,मंडल अध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या असून सर्वांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.