निवडणुकीतील तक्रारींसाठी टोल फ्री नंबर
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक २०२४ साठी आचारसंहिता लागू झाल्यापासून संबंधित क्षेत्रात निवडणूक विभागाची धडक मोहीम सुरू झाली आहे. अशातच निवडणुकासंदर्भात तक्रारी देण्यासाठी सीव्हीजल ऍप, एनजीपीसी वेबसाईट आणि १९५० या टोल फ्री नंबरवर १०० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. आचारसंहितेमध्ये एसटीवरील शासकीय जाहिरातींचे बॅनर वेळीच न हटवल्याने रत्नागिरी आगारातील वाहतूक अधीक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून शासकीय जाहिराती करणारे अथवा योजनांचे बॅनर, फलक तसेच पोस्टर, राजकीय पुढार्यांचे पोस्टर, सर्व ठिकाणांहून हटविण्याची मोहीम हाती घेतली जाते. मोहिमेत जिल्ह्यातील तब्बल ८ हजारांहुन अधिक पोस्टर हटवले आहेत. यापैकी शासकीय मालमत्तेवरील सुमारे ५ हजार ८७६ ठिकाणी तर जिल्ह्यातील ३ हजार ५५४ खाजगी मालमत्तेवर कारवाई करण्यात आली. www.konkantoday.com