खेडचा अग्निशमन बंब तांत्रिक दुरूस्तीसाठी चिपळूणला
खेड तालुक्यातील फुरूस चांदणीचौक येथे ५ दिवसांपूर्वी झालेल्या भीषण आगीत सिलिंडर स्फोटाच्या अग्नितांडवानंतर उसळलेला आगडोंब नियंत्रणात आणताना येथील नगर परिषदेच्या अग्निशमन बंबामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा अग्निशमन बंब दुरूस्तीसाठी चिपळूण येथे पाठवण्यात आला आहे. यामुळे आता आगीसारखी दुर्घटना घडल्यास आणखी काही दिवस बंबावर मदार राहणार आहे. गेल्या तीन महिन्यात येथील अग्निशमन केंद्रातील बंबाने तब्बल ३८ ठिकाणी लागलेली आग विझविल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. शहरासह ग्रामीण भागात वणव्यांसह आगीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. www.konkantoday.com