
नमन कलाकारांना शासन दरबारी योग्य तो न्याय देऊ -किरण सामंत यांचे आश्वासन
नमन कलाकारांना शासन दरबारी योग्य तो न्याय देऊ -किरण सामंत यांचे आश्वासनकोकणातील नमन कला ही करमणुकीचे महत्वाचे साधन असून सध्या ही कला लोप पावते की काय अशी भीती वाटत असताना जिल्ह्यातील कलावंतांनी मोठ्या परिश्रमाने या नमन कलाकाराला शासन दरबारी योग्य न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाही सिंधुरत्न समृद्धी योजनेचे सदस्य किरण उर्फ भैया सामंत यांनी दिली.सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सह्याद्री संकुलामध्ये आयोजित आमदार शेखर निकम चषक २०२४ जिल्हास्तरीय नमन स्पर्धेचे उदघाटन सामंत तसेच आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नमन कलाकारांना सह्याद्री रत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.www.konkantoday.com