संगमेश्‍वर तालुक्यातील जि.प. तेर्ये शाळेमध्ये दुसरा शिक्षक पाठवला

विद्यार्थ्याने गृहपाठ केला नाही म्हणून विद्यार्थ्याला मारहाण करणार्‍या शिक्षिकेविरूद्ध पालकांनी तक्रार केल्यानंतर शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी संगमेश्‍वर तालुक्यातील तेर्ये शाळेमध्ये परीक्षा घेण्यासाठी बुधवारी नवीन शिक्षक पाठवून परीक्षा घेतली. तसेच मारहाणप्रकरणी शिक्षण विभागाकडून त्या शिक्षिकेची चौकशी सुरूच आहे. बुधवारी केंद्रप्रमुख यांना शाळेवर पुन्हा चौकशीसाठी पाठवण्यात आले. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष सुनील दळवी यांनी त्यांची भेट घेतली. मात्र मारहाण करणार्‍या शिक्षिकेला शाळेत पाठवल्यामुळे पालक व ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले असून पालक आणि ग्रामस्थ यांनी सभेचे आयोजन केले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button